मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७
सोमवार, २५ डिसेंबर, २०१७
नववर्षाला तरी काही मिळू द्या....
*"पगारवाढीला विरोध करणाऱ्यांनी खुशाल बदला घ्या..!"*
नवीन वर्ष 5 दिवसांवर येऊन ठेपलय...पण एक दमडीची देखील पगारवाढ झालेली नाही. आश्वासनांच्या वाऱ्यांनी फक्त पावसाचा देखावा निर्माण केला पण ओलाव्यासाठी एक थेंब देखील भूतलावर कोसळला नाही.
मान्यताप्राप्त संघटनेने ज्या पद्धतीने विषय हाताळला पाहिजे होता तो न हाताळल्याने सर्व सामान्य कर्मचारी नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला आहे, एसटीच्या अधिकाऱ्यांनी देखील विषयाचे गांभीर्य समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे होते कारण सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना संघटनात्मक प्रेम कमी व पगारवाढीची आशा जास्त आहे परंतु ते देखील निरुत्साही असल्याने नववर्ष देखील अंधारमय कोठडी तील मुक्कामासारखे साजरे होण्याची शक्यता आहे. आणि बदलाच घ्यायचा असेल तर निधड्या छातीने एसटी कामगार देखील मागे हटणार नाही, मनसोक्त वार करा अन मिळवा आसुरी आनंद......
न्यायालयीन प्रक्रियेत करार केव्हाही होवो पण सध्या तरी जास्तीचे चार पैसे खिशात पडले तरी कर्मचारी मनापासून आभार प्रदर्शन करायला तत्पर राहील.
मान्यताप्राप्त संघटनेच्या डावपेचात कामगार जखमी झाला आहे व अधिकाऱ्यांमार्फत जखमेवर मलमपट्टी करण्याची गरज आहे.
सोमवार, ३ एप्रिल, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)








